खानापूर

हरिप्रिया एक्सप्रेसमधून उडी; तरुणाचे दोन्ही पाय कट

तिकीट न घेतल्याने तरुणाचे दोन्ही पाय गमावले; चालत्या ट्रेनमधून उडी महागात पडली

गोकाक (कोंण्णूर) – तिकीट न घेता प्रवास करत असलेल्या एका तरुणाने टीसीकडून पकडले जाण्याच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात त्याचे दोन्ही पाय कट झाले. ही दुर्दैवी घटना गोकाक तालुक्यातील कोण्णूर रेल्वे स्थानकाजवळ घडली.

सदर तरुणाने बेळगावहून हरिप्रिया एक्सप्रेसमध्ये तिकीट न घेता प्रवास सुरू केला होता. मात्र गोकाक रोड स्थानकाजवळ गाडी थांबण्याआधीच, दुपारी सुमारे १२:४५ वाजता, टीसीकडून पकडले जाईल या भीतीने चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याचे पाय गाडीतून खाली उतरताना चाकांखाली आले आणि रेल्वेच्या फिशप्लेटमध्ये अडकून दोन्ही पाय तुटले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने घटप्रभा रेल्वे कार्यालयात हलवले. पुढील उपचारांसाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तरुणाची ओळख गोकाक तालुक्यातील शिंदिकुर्वेठ (शिंदिकुरुबट्टी) गावातील रहिवासी म्हणून झाली आहे.

फक्त ५० रुपये – म्हणजेच बेळगाव ते घटप्रभा प्रवासाचे तिकीट – वाचवण्याच्या प्रयत्नात हा मोठा अपघात घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अनेक जण म्हणत आहेत, “तिकीट न घेण्याच्या छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण आयुष्यच अंधारात गेले…”

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या